बधीर
फार मोठे शब्द वापरत नाही
थोडक्यातच सांगतो
ह्या शहराच्या अलोट गर्दीमध्ये
खूप आवाज आहेत चांगले,वाईटही
आवाजांचीही गर्दी झाली आहे!
प्रत्येक कुंपणात एक कुत्रा भुंकतोय
कुठे कुत्र्यांमधे मारामारी आहे
कोणी चेहे-याला कुंपण घालतोय
प्रत्येक मालकाचे नियम ठरलेले
कोणाच्या आवारात शिरकाव करावा
खाली पडलेल्या पावासाठी
कुंपण नसल्याचा बहाणा करावा
आवाजाच्या जंगलामध्ये
निवडुंगाशिवाय झाडी नाही
काट्यांचे प्रकार सातशे
पाण्याचा मात्र एक थेंबही नाही
हरएक आवाजामागे इथे
किमान एक मुखवटा जगतो
मझासुद्धा चेहेरा मला
आरशात बघावा लागतो
युद्ध चालू आहे बाहेर
काचा काळ्या आणि कुंपण उंच
लहान बाळ रडतंय घरात
दरवाजे खिडक्या कडेकोट बंद
कुंपणावरुन उडालेल्या भांडणात
तुझ्या संगीताची कोण करेल फिकीर
गिलमोर, तू बरोबर बोलतोस
सगळेच आहेत सोयीस्कररित्या बधीर....
Last 4 lines dedicated to David Gilmour! ( Pink Floyd )
good one :)
ReplyDeletehi... sarang....
ReplyDeleteGilmour... badhir... nakkich comfortably numb wishayi bolatoyes na.....
mi yawar kahi mhanan awaghadach aahe... manal tula.. :-))......
धन्यवाद! ही खूप पूर्वी सुचलेली कविता आहे, अगदी अमेरिकेत नवीन होतो तेव्हाची ! संपूर्ण कविता गिल्मोर वर नाहीये तर त्यातला काही भाग हा माझ्या पिन्क फ्लॉईड प्रेमामुळे ह्या कवितेत आला आहे!! :-)
ReplyDelete