अनेक दिवस आणि महिन्यांनी कशीबशी ही एक कविता सुचते हो! हल्ली लिहिणं फार far away झालंय! पाचशे ओळी एका वेळी मनात नाचत असतात पण त्याच वेळी grocery आणायला जावं लागतं, वातावरण नीट रहावं म्हणून काही बोलून दाखवावं लागतं...इत्यादि इत्यादि....आपल्याला सगळ्यांना 'एक खिडकी योजना' आवडते ना, तर आपलं आयुष्यही तसंच झालं आहे असं वाटतं..आपण सगळे एक silent obedient consent देऊन बसलो आहोत आणि कुणी कुणाच्या फारसं वाटेला न जाता, फार प्रश्न न विचारता आपलं जे काही असेल ते पुढे चालू ठेवत आहोत......खूप मानवशास्त्रज्ञांच्या मते १९५० नंतरचा काळ हा संपूर्ण पृथ्वीवरच्या आत्तापर्यंतच्या मानवी कालखंडातला 'सगळ्यात शांतततापूर्ण काळ' आहे...आणि 'शांतीत क्रांती' म्हणजे चोरून वडे खाण्यासारखं आहे. बाहेरून दिसणार्या शांततेतही खूप गदारोळ आहे. हे झालं बाहेरचं... माझ्या स्वतःत पाहिलं तर आपण कुठे चाललो आहे ह्याचं भान नसलेली व्यक्ती आणि क्रियाहीनता दिसते. तर काही नाही, तर फार न लिहीता ही नवीन कविता...
धिक्कार हो!
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
तू एक पणती मिणमिणती
भिकार ते दिवाळीतले फटाके
जे ऊजळती राहून तुझ्या संगती
तू एक पणती मिणमिणती
भिकार ते दिवाळीतले फटाके
जे ऊजळती राहून तुझ्या संगती
भावना तुझ्या बुळबुळीत अश्रू
लेखणी सुतकी रडू लागली
वासना तुझ्या विनोदी झुरळ ते
वहाणही कच खाऊ लागली
लेखणी सुतकी रडू लागली
वासना तुझ्या विनोदी झुरळ ते
वहाणही कच खाऊ लागली
जोहार हे जगणे तुझे अन
न मागताच तू मुंडके दिले
सशाचे फुकाचे हृदय तुझे अन
ढगाने मदाने हसूं पाहिले
न मागताच तू मुंडके दिले
सशाचे फुकाचे हृदय तुझे अन
ढगाने मदाने हसूं पाहिले
पाटच्या पाण्यातसुद्धा
रंग तुजला दिसला खूनाचा
वारही तूच केलेस अन
खर्चही मागशी आता वेदनांचा
रंग तुजला दिसला खूनाचा
वारही तूच केलेस अन
खर्चही मागशी आता वेदनांचा
प्रेम जे केलेस तेही
चोरट्यांना भरपूर दिसले
मद्य जे प्यालेस तेही
शंभरांना आधीच प्याले
चोरट्यांना भरपूर दिसले
मद्य जे प्यालेस तेही
शंभरांना आधीच प्याले
प्रार्थना जशी तुझी ती
भज्यांवरची माशीच की
कंटाळूनी तो हाकली देवही
शिळे लपविण्या त्यासही यत्न की
भज्यांवरची माशीच की
कंटाळूनी तो हाकली देवही
शिळे लपविण्या त्यासही यत्न की
अंगारे धुपारे दुपारी सुपारी
फोटोतही दिवा तूच लावला
विजांच्या कडाक्यातही त्या
अंधारही तूच की कमावला
फोटोतही दिवा तूच लावला
विजांच्या कडाक्यातही त्या
अंधारही तूच की कमावला
का उगाच्या फुशारक्या अन
काय तू दिलेस ह्या धरेला
का म्हणशी सूर्यास ह्या आंधळा
ग्रहण जे लागले तुझ्या डोळा
काय तू दिलेस ह्या धरेला
का म्हणशी सूर्यास ह्या आंधळा
ग्रहण जे लागले तुझ्या डोळा
सावकारी हा रथ निघाला
तू बैलजोडी ही कोडगी
आसूडांचा पाऊस पडला
का साहसी सर्व हे, फोड की
तू बैलजोडी ही कोडगी
आसूडांचा पाऊस पडला
का साहसी सर्व हे, फोड की
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
तू एक पणती मिणमिणती
अंतरिक्षात सुस्नात बालक तुझे अन
का दाबशी घशात स्वतःच्या माती ?
तू एक पणती मिणमिणती
अंतरिक्षात सुस्नात बालक तुझे अन
का दाबशी घशात स्वतःच्या माती ?