उनाडक्यांबद्दल थोडेसे

नमस्कार मित्रमंडळी,
आम्ही सुरु केलेल्या उनाडक्यांबद्दल थोडेसे! मुळात स्वत:ची लिहायची हौस भागवण्यासाठी आणि अनेक मित्रांपर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी उनाडक्या सुरु कराव्यात असा विचार होता. पण अनेक मित्र-मैत्रीणी, ज्यांना लिहायचे तर आहे पण बर्‍याच वेळा संकोचामुळे लिहीता येत नाही. कधीकधी सुरुवातीचा बहर ओसरल्यानंतर येणार्‍या पोकळीमुळे लिहीणे होत नाही. मग थोडक्यासाठी ब्लॉग सुरु करुन तो चालवावा कसा हा प्रश्न पडतोच!
अशा अनेक प्रश्नांचं एक सोपं उत्तर असावं आणि त्या मित्र-मैत्रीणींनादेखील आमच्याबरोबरीने लिहीता यावं म्हणून या उनाडक्या! हा फक्त आमचा दोघांचा ब्लॉग नसून आपणा सगळ्यांचा आहे. ज्याला नवीन काही लिहावसं वाटेल त्याला सहज प्रकाशित करता यावं असं हे स्थळ!

आम्ही तर लिहीतोच आहोत, पण तुम्हालादेखील जेव्हा केव्हा काही उनाडक्या करायच्या असतील, किंवा कधीकाळी केलेल्या उचापती, आलेले अनुभव शेअर करायचे असतील तेव्हा तेव्हा आम्हाला जरुर कळवा.

'जे मनात येईल ते' लिहिणार्‍या आणि वागणार्‍या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत!


-- सारंग आणि समीर